पीडित कुटुंबायांनी घेतली प्रकाश आंबेडकर यांची भेट
अकोला : दहिहंडा पोलिस स्टेशन अंतर्गत मेहतर समाजातील युवकाला पोलिस अधिकाऱ्यांनी बेदम मारहाण केली होती. ह्या अन्यायाला कंटाळून त्या युवकाने विषारी औषध घेऊन आपली जिवनयात्रा संपवली होती. आरोपी असलेले तीनही पोलिस अधिकारी यांच्यावर कारवाई केली गेली नसल्याने आज त्या युवकाच्या कुटुंबातील सदस्यांनी नेते बाळासाहेब आंबेडकर यांची भेट घेतली व या प्रकरणी लक्ष घालण्याची विनंती केली.