परभणीत वंचितचा जन आक्रोश मोर्चा:’प्रकाश आंबेडकर होणार सहभागी
परभणीत वंचितचा आक्रोश मोर्चा; शहीद सोमनाथ सूर्यवंशी आणि विजय वाकोडे यांना न्यायाची मागणी
शहीद भीमसैनिक सोमनाथ सूर्यवंशी आणि शहीद लोकनेते विजय वाकोडे यांना न्याय मिळावा, या प्रमुख मागणीसाठी वंचित बहुजन आघाडी परभणीत आक्रोश मोर्चा काढणार आहे. हा मोर्चा 30 जानेवारी 2025 रोजी आयोजित करण्यात आला असून, शनिवार बाजार मैदानावरून सकाळी 11 वाजता मोर्चाला सुरुवात होईल आणि जिल्हाधिकारी कार्यालयावर त्याचा समारोप होईल.
सोमनाथ सूर्यवंशी आणि विजय वाकोडे यांच्या बलिदानाचा सन्मान राखला जावा, त्यांच्या कुटुंबीयांना योग्य न्याय मिळावा आणि संबंधित प्रकरणांमध्ये ठोस कारवाई व्हावी, अशी मागणी या मोर्चामार्फत केली जाणार आहे.
वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय नेते प्रकाश आंबेडकर या मोर्चात सहभागी होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. त्यांच्या उपस्थितीमुळे मोर्चाला मोठे राजकीय आणि सामाजिक वजन मिळणार आहे.
संविधानिक न्यायासाठी आणि सामाजिक समानतेच्या लढ्यासाठी नागरिकांनी मोठ्या संख्येने या मोर्चामध्ये सहभागी होण्याचे आवाहन वंचित बहुजन आघाडीने केले आहे.
