पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटलांना वंचितचा घेराव

आरक्षण डावलून होणाऱ्या जिल्हा बँकेच्या भरतीला वंचित बहुजन आघाडीचा विरोध पालकमंत्री ना. राधाकृष्ण विखे यांना निवेदन; भरती प्रकिया थांबविण्याची मागणी!
अहिल्यानगर जिल्हा सहकारी बँकेच्या भरती प्रक्रियेमध्ये आरक्षणाची तरतूद वगळण्यात आल्याप्रकरणी आज जिल्ह्याचे पालकमंत्री माननीय नामदार राधाकृष्ण विखे पाटील साहेब यांची अहिल्यानगर येथे भेट घेतली. वंचित – शोषित घटकांवर अन्याय होऊ नये असा आग्रह मंत्रिमहोदयांकडे धरला.
संचालक मंडळाचा कुठल्याही रास्त प्रक्रियेशिवाय आरक्षणाची तरतूद रद्द करणाऱ्या निर्णयाचा निषेध नोंदवला; संविधानिक मार्गाने जो पर्यंत भरतीची प्रक्रिया राबवली जात नाही, तो पर्यंत भरती थांबविण्याची मागणी पालकमंत्री मा. राधाकृष्ण विखे पाटील यांच्याकडे निवेदनाद्वारे करण्यात आली आहे.
समवेत वंचित बहुजन आघाडीच्या उत्कर्षा रुपवते,दक्षिण जिल्हाध्यक्ष मा. योगेश साठे, शहराध्यक्ष मा. हनीफ भाई शेख, शहर महासचिव मा. अमर निरभवने, शहर उपाध्यक्ष मा. प्रवीण ओरे, जिल्हा महासचिव मा. अनिल जाधव, जिल्हा सल्लागार जे.डी. शिरसाठ, भिंगार शहराध्यक्ष मा. राजीव भिंगारदिवे, नगर तालुकाध्यक्ष मा. मारुती पाटोळे, नेवासा तालुकाध्यक्ष मा. पोपट सरोदे, राहुरी तालुकाध्यक्ष मा. संतोष चोळके आदी उपस्थित होते.