साकळीसह लाखो भाविकांचे श्रद्धास्थान साकळी येथील हजरत सजनशाह वली (रहे.) यांच्या… उर्स सोहळ्यास सुरुवात , बाबांचा उर्स गावाची धार्मिक परंपरा


साकळी येथील ऐतिहासिक दर्गा सर्वत्र प्रसिध्द दुसऱ्या दिवशी म्हणजे सोमवारी रात्री सुपसिद्ध कव्वालीचामहामुकाबला साकळी ता. यावल (वार्ताहर) – येथील हजरत सजनशाह वली(रहे.) यांच्या ऎतिहासिक उर्स सोहळ्यास आज दि. ७ रोजी पासून सुरुवात होत आहे. हिंदू-मुस्लिम ऐक्याचे प्रतिक असलेल्या या उर्स सोहळ्यास शेकडो वर्षाची परंपरा आहे.या दिवशी सालाबाद प्रमाणे बाबांच्या संदल निमित्त वाजत – गाजत भव्य मिरवणूक काढली जाणार आहे. संदल निमित्त जिल्ह्यातुन नव्हे तर जिल्ह्याबाहेरुन तसेच महाराष्ट्राबाहेरुन हजारो भाविक भक्त बाबांच्या दर्ग्याच्या दर्शनासाठी येतात.

हिंदू- मुस्लिम ऐकतेचे प्रतिक-हा उर्स गावाचा सांस्कृतिक व धार्मिक वारसा असून ऐकतेचे प्रतिक आहे.प्राचीन काळी डांभूर्णी ता.यावल येथील राजपूत परिवारातील महिला राजवंतीबाईस हजरत सजनशाह वली(रहे.) बाबांनी बहिण मानून राखी बांधून घेतली व राखीची भेट म्हणून जमिनी दिल्या. तेव्हा पासून वंश परंपरेने या महिलेच्या परिवारातुन आजही एकादशीला संदल निमित्त सर्वप्रथम बाबांच्या पवित्र मझ़ार वर चादर चढविली जाते.

Advertisement

ऐतिहासिक दर्गा – हजरत सजनशाह वली(रहे.) यांचे नाव शाह अ.लतीफ (रहे.) असे आहे. ख्याजा अजमेरी यांच्या सहकाऱ्यांमध्ये गणना होते.बाबा शेकडो वर्षापुवीं साकळी येथे आले. त्यांचा दर्गा ऐतिहासिक आहे. दर्गा चारही बाजूंनी पाहिल्यावर सारखाच दिसतो.दर्गा अतिशय कलाकुसरतेने बांधलेला असून लाकडाचा दरवाजा आहे.
आम लंगरचा कार्यक्रम- संदल निमित्त दि. ०७ रोजी रविवार रोजी अरमान बाबा(मुजावर ) व त्यांचे सहकारी व गावकऱ्यांच्या मदतीने दर्गापरिसरात लंगरे आम( महाप्रसाद) ठेवला आहे.हजारो भाविक या महाप्रसादाचा लाभ घेणार आहे.

त्याचप्रमाणे लोकनियुक्त संरपच दिपक नागो पाटील सामाजिक कार्यकते युनुस मन्सुरी मा.जी. ग्रां पं. सदस्य जहांगीर खान कुरेशी राष्ट्रवादीचे पदाधिकारी न्याज्यो शेठ ताहेर कुरेशी अकबर मेंबर अक्सा फाऊंडेशन साकळीयांनी व गावकऱ्यांच्या मदतीने सोमवारी रात्री दर्गासमोर कव्वाली चा कार्यक्रम आयोजीत केला आहे त्यात सुपसिद्ध कव्वाल अजीम नाजा(दिल्ली ) व छोटी शबनम ( कोल्हापुर )यांची जुगलबंदी पहावयास मिळणार आहे सुरुवातीला कव्वाल हे ईश्वरभक्ती व नआत म्हणून भाविकांना मंत्र -मुग्ध करणार आहे.या दर्गापरिसरात उर्स निमित्त पाच बाजार भरविले जातात.या उर्स दरम्यान सर्वत्र उत्साहाचे व धार्मिक वातावरण असते.


Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Translate »