भावना गवळींच्या संस्थेची बँक खाती गोठवली, आयकर खात्याची वक्रदृष्टी


आयकर विभागाने कर चुकवल्याप्रकरणी शिंदे गटातील यवतमाळ-वाशिमच्या खासदार भावना गवळी यांच्या ‘महिला उत्कर्ष प्रतिष्ठाण’चे बँक खाते गोठवले आहेत. ८ कोटी २६ लाखांचा आयकर थकवल्याप्रकरणी आयकर विभागानं ही कारवाई केली आहे. कलम २२६ (३) अंतर्गत आयकर विभागानं कारवाई केलीय. तसेच कर चुकवोगिरीप्रकरणी आयकर विभागानं महिला उत्कर्ष प्रतिष्ठानच्या विश्वस्त आणि संचालकांना कारणे दाखवा नोटीस बजावली आहे. मागच्या आठवड्यात आयकर विभागाने खासदार भावना गवळी यांना नोटीस बजावल होती. त्यानंतर खासदार गवळींनी दोन दिवसांपूर्वी अकोल्यातील आयकर कार्यालयात सीएच्या माध्यमातून कागदपत्रे सादर केली होती. आयकर विभागाचं समाधान न झाल्यानं खाते सील केल्याचा दावा केला जातोय. या संस्थेनं २०१३ ते २०१६ मध्ये आयकर चुकवल्याचा आरोप आहे, अशी माहिती विश्वसनीय सूत्रांनी दिली आहे.

दोन दिवसांपूर्वी आयकर विभागाच्या नोटीसीला खासदारांच्या ‘सीए’ने दिले उत्तर…

Advertisement

शिवसेना शिंदे गटातील यवतमाळ-वाशिमच्या खासदारभावना गवळी यांच्या महिला उत्कर्ष प्रतिष्ठान संस्थेतआर्थिक गैरव्यवहार प्रकरणी अकोला येथील आयकरविभागाने बजावलेल्या नोटीसीला शुक्रवारी (५ जानेवारी)त्यांच्या ‘सीए’कडून स्पष्टीकरण देण्यात आले होते. आयकर विभागानं भावना गवळी यांना महिला उत्कर्ष प्रतिष्ठान संस्थेतील १८ कोटिंवर रुपयांचा हिशोब देण्याबाबत नोटीस बजावण्यात आली होती. या नोटीसीला ५ जानेवारीपर्यंत उत्तर देण्याची मुदत होती. याप्रकरणी ३० ऑगस्ट २०२१ रोजी ईडीच्या पथकांनी वाशिमच्या रिसोड तालुक्यातील देगावमध्ये कारवाई केली होती.

मात्र, खासदार गवळींनी संस्थेचे खाते सील झाल्याची बातमी फेटाळली. अशी कोणतीही माहिती आपल्यापर्यंत आली नसल्याची माहिती नाहीये. संस्थेत काही लोकांनी १८ कोटींचा अपहार केल्याचा गवळींच म्हणण असून याआधीही तक्रार नोंदवली होती की संस्थेच्या कार्यालयातून ७ कोटीची रक्कम गहाळ झाल्याची तक्रार दिली होती.


Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Translate »