ओबीसी नेते राजेश बेले यांचा वंचित बहुजन आघाडीत प्रवेश
वंचित बहुजन आघाडीमध्ये विविध पक्ष संघटना आणि नेत्यांच्या प्रवेशाचा सपाटा सुरुच आहे. वंचित बहुजन आघाडीचे नेते ॲड. बाळासाहेब आंबेडकर यांच्या उपस्थितीत आज यशवंत भवन अकोला येथे चंद्रपूर येथील ओबीसी नेते राजेश वारलुजी बेले यांनी वंचित बहुजन आघाडीत जाहीर प्रवेश केला आहे.
या वेळी भारिप बहुजन महासंघाचे प्रदेशाध्यक्ष अशोक सोनोने, वंचित बहुजन आघाडीचे प्रदेश सदस्य कुशल मेश्राम, पश्चिम विदर्भ महासचिव बालमुकुंद भिरड, ओबीसी नेते गोपाल राऊत, जिल्हाध्यक्ष चंद्रपूर पश्चिम प्रा. डॉ. सोमाजी गोंडाणे, पूर्व चंद्रपूर जिल्हा कार्याध्यक्ष जयदीप खोब्रागडे, चंद्रपूर महानगर अध्यक्ष बंडू ठेंगरे, चंद्रपूर महानगर कार्याध्यक्ष सतीश खोब्रागडे यांच्यासह अनेक कार्यकर्ते उपस्थित होते.