यवतमाळ मध्ये शेतकऱ्यांचे मोठया प्रमाणात नुस्कान
यवतमाळ जिल्ह्यात झालेल्या अवकाळी पावसामुळे जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या गहू, हरभरा, संत्रा, आंबा पिकाचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले.
शेतकऱ्यांना नुकसान भरपाई लवकर मिळावी यासाठी वंचित बहुजन आघाडीचे जिल्हाध्यक्ष डॉ. नीरज वाघमारे यांच्या नेतृत्वात वंचितच्या सर्व पदाधिकाऱ्यांनी यवतमाळ जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देऊन झालेल्या नुकसानीचा पंचनामा तातडीने करण्याची मागणी केली.
या वेळी वंचितचे जिल्हा अध्यक्ष डॉ. नीरज वाघमारे, महिला अध्यक्षा धम्मवती वासनिक, युवा आघाडीचे अध्यक्ष आकाश वाणी, जिल्हा महासचिव शिवदास कांबळे, उपाध्यक्ष विशाल पोले, तालुकाध्यक्ष प्रफुल्ल शंभरकर, महासचिव महिला सरला चचाने, प्रशांत भारसाकळे यांच्यासह पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते.