पुणे जिल्ह्यात एकाच दिवशी वंचितच्या 7 शाखांचे उदघाट्न
Pune जिल्ह्यात वंचितचा वंचितचा डंका गाव तिथे शाखा मोहिमे अंतर्गत पुणे जिल्ह्यातील खेड (राजगुरूनगर) तालुक्यामध्ये वंचितचे सर्वेसर्वा बाळासाहेब आंबेडकर यांचे हात मजबूत करण्यासाठी एकाच दिवशी वंचित बहुजन आघाडीच्या 7 शाखांचे मोठ्या थाटामाटात उद्घाटन करण्यात आले. पुणे जिल्हा पूर्व अध्यक्ष राज कुमार यांच्या हस्ते या शाखांचे उद्घाटन करण्यात आले.
राजगुरुनगर येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून शाखा उद्घाटन कार्यक्रमाला सुरुवात झाली. दोंदे, शिरोली, सिद्धेगव्हाण, शेलपिंपळगाव, कोयाळी, शेलगाव, वडगाव घेनंद या ठिकाणी वंचितच्या शाखेचे उद्घाटन करण्यात आले.
या वेळी महिला जिल्हाध्यक्ष सीमाताई भालेसाईन, पुणे जिल्हा महासचिव सतीश साळवे, उपाध्यक्ष रणजीत पाडळे, जिल्हा उपाध्यक्ष सचिन साबळे, संपर्कप्रमुख ॲड. वैभव कांबळे, धीरज कांबळे, प्रबोधनकार सुधाकर अभंग आणि जावेद मोमीन यांच्यासह पदाधिकारी, कार्यकर्ते व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.