नेवासा येथे भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त नियोजन बैठक
महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या 134 व्या जयंती निम्मित दरवर्षी प्रमाणे नेवासा शहरात मोठ्या धूमधडक्यात जयंती साजरी होणार आहे.जयंतीच्या नियोजनासाठी दि.24 मार्च 2024 रोजी नेवासा येथे नेवासा तालुका डॉ. बाबासाहेब आंबेडकर उत्सव समितीच्या वतीने बैठकीचे आमंत्रण देण्यात आले आहे. मोठ्या संख्येने भीमसैनिकांनी बैठकीस उपस्थिती राहावे असे आवाहन बहुजन नेते संजय सुखदान यांनी केले आहे.