केजरीवाल यांची अटक ही दडपशाही-प्रकाश आंबेडकर
सक्त वसुली संचलनालयाकडून Arvind kejriwal यांना ताब्यात घेण्यात आले आहे. त्यांना अटक केल्यामुळे आता त्यांची रवानगी तुरुंगात होणार आहे. लोकसभा निवडणुकीपूर्वी आम आदमी पक्षाला मोठा धक्का बसला आहे या प्रकरणावर माध्यमाशी बोलताना वंचितचे सर्वेसर्वा माजी खासदार prakash ambedkar म्हणाले की
कोर्टाने पहिल्यांदा ठरवलं पाहिजे की कॅबिनेट डिसीजनमध्ये झालेल्या निर्णयावर तुम्ही प्रश्न विचारु शकता का? चौकशी करु शकता का? हे बेसिक आहे. संविधानामध्ये कॅबिनेट नोट किंवा कॅबिनेट डिसिजन हे असताना तुम्हाला कोर्टामध्ये काॅल करता येत नाही. जेव्हा कोर्टामध्ये काॅल करता येत नाही. तेव्हा चौकशीसुद्धा होत नाही. हा फंडामेंटल इश्यू आहे, असे मी मानतो.
त्यामुळे सर्वोच्च न्यायालयाने ते पहिल्यांदा ठरवावं, ही माझी सर्वोच्च न्यायालयाला विनंती आहे. ईडीला या पाॅलिसी डिसीजनच्या प्रकरणात जाता येत नाही. त्यामुळे ही एका प्रकारची दडपशाही आहे..