प्रा. किसनराव चव्हाण यांच्यावर खोटा गुन्हा दाखल करणाऱ्या PI पुजारींची चौकशी करा कोर्टाचा आदेश
शेवगाव पोलीस स्टेशनचे तत्कालीन पोलीस निरीक्षक विलास पुजारी यांनी वंचित बहुजन आघाडीचे प्रदेश उपाध्यक्ष प्रा. किसन चव्हाण यांच्या विरुद्ध दंगलीचा खोटा गुन्हा दाखल करून केलेल्या कारवाई विरोधात पोलीस निरीक्षक विलास पुजारी यांची चौकशी करून अहवाल सादर करण्याचा आदेश जिल्हा न्यायाधीश एम. एस. लोने यांनी दिला आहे.दि.१४ मे २०२३ रोजी शेवगाव येथे छत्रपती संभाजी महाराजांच्या जयंतीच्या मिरवणुकीत झालेल्या दंगल प्रकरणी तत्कालीन पोलीस निरिक्षक विलास पुजारी यांनी शेवगाव शहरातील अनेक निरपराध लोकांना आरोपी म्हणून गोवले.वंचित बहुजन आघाडीचे प्रदेश उपाध्यक्ष प्रा.किसन चव्हाण हे दंगलीच्या दिवशी बाहेर गावी असताना देखील पोलीस निरीक्षक विलास पुजारी यांनी सुडाच्या भावनेने प्रा.किसन चव्हाण यांना दंगलीत आरोपी बनवले होते.प्रा किसनराव चव्हाण यांनी अतिरिक्त जिल्हा न्यायाधीश एम. एस. लोणे यांच्या कोर्टात १५६/३ नुसार अर्ज दाखल केला होता. त्या अर्जावर सुनावणी होऊन न्यायालयाने पोलीस निरीक्षक विलास पुजारी यांच्या विरोधात आदेश पारित करून योग्य ती चौकशी करून अहवाल सादर करण्याचा आदेश दिला आहे
प्रा.किसन चव्हाण यांच्या वतीने ज्येष्ठ विधीज्ञ ॲड. दिपक श्यामदिरे, ॲड. कुणाल सरोदे, ॲड. किरण जाधव, ॲड. प्रसाद राख, आणि ॲड. हर्षद बोखारे यांनी काम पाहिले.