भ्रष्टाचार आणि फसवणूक करणाऱ्या मनपाच्या पट्टीची वंचित ने केली होळी.
अकोला-शहरांतील नागरिकांना दिल्या गेलेल्या आवाजवी पाणी पट्टी बिलाची अभिनव होळी वंचित बहुजन आघाडीच्या वतीने जिल्हा परिषद अध्यक्ष संगिताताई अढाऊ ह्यांचे हस्ते सिव्हील लाईन चौक येथे सायं ७ वाजता करण्यात आली.महापालिका प्रशासनाने दिलेल्या ३० हजार
पाणी पट्टी देयकांची होळी करून मनपा प्रशासनाच्या मनमानी कारभाराचा निषेध केला.भ्रष्टाचार आणि फसवणूक करून मनपा ने दिलेल्या ३० हजार पाणी पट्टी देयकांची होळी जिल्हयात चर्चेचा विषय ठरला आहे.
महानगरपालिकेने शहरातील नागरिकांच्या घरगुती नळ कनेक्शन वर मीटर बसविले. या मीटरचे रीडिंग घेऊन नागरिकांना वेळेवर देयके देण्याची जबाबदारी संबंधित “कंत्राटदारांची” होती. परंतु संबंधित कंत्राटदारांकडून कुठे वर्षभर तर कुठे ६ महिने रीडिंग घेतल्या गेले नाही तर काही भागात कधीच रीडिंग घेतल्या गेले नाही.
काही ठिकाणी तर अवैध नळ कनेक्शन देण्यात आले. महानगरपालिकेने “मनमानी” पद्धतीने नागरिकांना पाणीपट्टीची देयके देण्यात आली.
रीडिंग घेऊन देयके वाटण्यासाठी ज्या कंत्राटदाराला जबाबदारी देण्यात आली ते कंत्राटदारही काही “राजकीय लोकांच्या मर्जीतले” व निकटवर्तीय असल्याची चर्चा आहे. त्यामुळे कंत्राटदाराकडून मनमानी पद्धतीने देयके वाटून ती वसूल करण्यासाठी प्रक्रिया पार पाडली जात आहे. काही ठिकाणी ही मनमानी देयके नागरिकांनी भरली नाहीत म्हणून नळ जोडण्या तोडण्यात आलेल्या आहेत.
याबाबत महानगरपालिकेत वंचित बहुजन आघाडी नगरसेवकांनी अनेक सभांमध्ये अनेक तक्रारी केल्या,आवाज उठविले. वंचित बहुजन आघाडी या मनमानी विरोधात अनेक वेळा निवेदने दिली. शहरात अजूनही पाणीपट्टी देयकांची अत्यंत मनमानी सुरू आहे.ही चुकीची पाणी पट्टी कर आकारणी थांबवून योग्य पद्धतीने कर आकारणी करण्यात यावी अशी मागणी करत वंचित बहुजन आघाडी सव्हिल लाईन चौक येथे होळी केली.या वेळी वंचित बहुजन आघाडी च्या नेत्या प्रा अंजलीताई आंबेडकर,पार्लामेंट्रि बोर्ड सदस्य अशोकभाऊ सोनोने, प्रदेश प्रवक्ते राजेंद्रभाऊ पातोडे, महीला आघाडी प्रदेश महासचिव अरुंधतीताई शिरसाट,जिल्हाध्यक्ष प्रमोद देंडवे, महीला आघाडी जिल्हाध्यक्ष प्रभाताई शिरसाट, जिल्हा महासचिव मिलिंद इंगळे, पुर्व महानगर अध्यक्ष शंकरराव इंगळे,पश्चिम कार्याध्यक्ष मजहर खान, महीला आघाडी महानगर अध्यक्ष वंदनाताई वासनिक, शहर संघटक निलेश देव, पश्चिम महानगर महासचिव गजानन गवई,
जि प सभापती आम्रपालीताई खंडारे, ऍड संतोष रहाटे,मनोहर बनसोड,सचिन शिराळे,डॉक्टर मेश्राम,अशोक शिरसाट, सुरेश शिरसाट, आकाश गवई,कीशोर मानवटकर,
राजु बोदडे, रितेश यादव,यांच्या सह अनेक नागरिक उपस्थित होते.