भाजपच्या गडातचं भाजपला धक्का,भाजपच्या नेत्याचा वंचितमध्ये प्रवेश
भाजपच्या गडातचं भाजपला धक्का,भाजपाच्या नेत्याचा वंचित मधे पक्षप्रवेश
लोकसभा निवडणुकेच्या पार्श्वभूमीवर भाजपचा गड मानल्या जाणाऱ्या नागपूर जिल्ह्यातील भारतीय जनता पक्षाचे नामवंत नेते शंकर चहांदे यांचा वंचित बहुजन आघाडीत प्रवेश.काल रात्री अकोला येथील वंचितचे सर्वेसर्वा Prakash ambedkar यांच्या यशवंत भवन या निवासस्थानी पक्ष प्रवेश सोहळा पार पडला.वंचित बहुजन आघाडीचे सर्वेसर्वा प्रकाश आंबेडकर यांच्या हस्ते वंचित बहुजन आघाडीचे मध्ये जाहिर पक्ष प्रवेश करत पक्षाची प्राथमिक सदस्यता ग्रहण केली.त्यांच्या सोबतच डॉ. दीपांकर नगरारे यांनी ही वंचित बहुजन आघाडीत पक्ष प्रवेश केला.या पक्ष प्रवेशाने वंचित बहुजन आघाडीची नागपूर मध्ये ताकत वाढल्याचे जानकरांचे मत आहे. यापक्ष प्रवेशावेळी
भारिप बहुजन महासंघाचे प्रदेशाध्यक्ष अशोक सोनोने,वंचित बहुजन आघाडीचे राज्य कार्यकारणी सदस्य कुशल मेश्राम, नागपूरचे जिल्हाध्यक्ष दिलीप दुपारे, जिल्हा महासचिव प्रशांत नगरकर, जिल्हा महासचिव अजय सहारे, जिल्हा उपाध्यक्ष नरेश वाघमारे, चंद्रशेखर वंजारी,यांच्या सह अनेक जन उपस्थीत होते.