वंचितचे सर्वेसर्वा प्रकाश आंबेडकर करणार 28 मार्चला उमेदवारी अर्ज दाखल
अकोला : वंचित बहुजन आघाडीचे नेते अॅड. प्रकाश आंबेडकर हे अकोला लाेकसभा निवडणूक लढणार असल्याचे 6 महिन्यापूर्वीच जाहीर केले होते.2019 ला अकोला आणि सोलापूर येथून निवडणूक लढवली होती. त्यामुळे वंचितचे सर्वेसर्वा प्रकाश आंबेडकर कुठून निवडणूक लढणार याबाबत त्यांच्या समर्थकांमध्ये उत्सुकता हाेती. वंचितचे सर्वेसर्वा प्रकाश आंबेडकर यांनी एकाच जागेवरून निवडणुक लढवणार असल्याचे जाहीर केले आहे.गुरुवार दि.28 मार्चला सकाळी 11 वाजता ते अकोला येथून उमेदवारी अर्ज भरणार आहेत.आता अकोला येथे दुरंगी लढत पाहायला मिळणार आहे.भाजपचे खा. संजय धोत्रे यांचे चिरंजीव अनुप धोत्रे व वंचितचे सर्वेसर्वा प्रकाश आंबेडकर यांच्यात हा सामना होणार आहे. सध्या अकोल्यात वंचितचे सर्वेसर्वा प्रकाश आंबेडकर यांचे पारडे जड असल्याचे म्हटले जात आहे. प्रकाश आंबेडकर गेल्या वेळसारखे मोठं शक्ती प्रदर्शन करत उमेदवारी अर्ज दाखल करणार आहेत.