वंचित बहुजन आघाडी शिरूर लोकसभा कार्यकर्ता मेळावा संपन्न
शनिवार दिनांक 27/04/2024
वंचित बहुजन आघाडीने शिरूर लोकसभा मतदारसंघांमध्ये उमेदवार प्रा. डॉ. आफताब अनवर शेख (OBC) दिल्यानंतर प्रथमच वंचित बहुजन आघाडीने शिक्रापूर या ठिकाणी कार्यकर्ता मेळावा आयोजित केला होता.
डॉ. आफताब अनवर शेख हे उच्चभ्रू शिक्षित असून त्यांनी समाजामध्ये वेगवेगळ्या पद्धतीने सामाजिक बांधिलकी राखत लोकांचे मदत केलेली आहे तसेच युवा पिढीला घडवण्यासाठी त्यांनी शैक्षणिक क्षेत्रामध्ये फार मोठे मोलाची योगदान दिलेले असून विद्यार्थ्यांना शिक्षणामध्ये व नोकरीमध्ये जास्तीत जास्त प्रमाणात घेऊन विद्यार्थ्यांचे भवितव्य घडवण्याच्या दृष्टीने मोठ्या प्रमाणात काम चालू आहे. त्यांचे शेतकरी, कामगार यांच्यासाठी ही मोठे योगदान असून अशा प्रकारचा उच्चशिक्षित उमेदवार शिरूर लोकसभेला प्रथमच मिळालेला आहे*
यावेळी बोलताना डॉ. आफताब अनवर शेख यांनी प्रथम वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय नेते ॲड. बाळासाहेब आंबेडकर तसेच प्रदेशाध्यक्ष रेखाताई ठाकूर यांचे आभार मानून, मी फक्त लोकसभा निवडणुकीपुरताच आपला नसून मरेपर्यंत आपल्या सोबत राहून समाजात येणाऱ्या अडचणी सोडवत राहणार आहे. शिवाय जे विद्यार्थी शिक्षणापासून वंचित आहेत अशा विद्यार्थ्यांना शैक्षणिक सर्वतोपरी मदत करणार असून इथल्या शेतकऱ्यांना स्वतःच्या मालाला हमीभाव मिळवण्यासाठी प्रयत्न करणार आहे असे मत व्यक्त केले.
यावेळी वंचित बहुजन आघाडी पुणे पुर्व जिल्हा अध्यक्ष राज कुमार बोलताना म्हणाले शिरूर लोकसभा मतदारसंघांमध्ये कोल्हे हे सिनेमामध्ये आणि नाटकांमध्ये व्यस्त असून त्यांना जनतेकडे लक्ष द्यायला वेळ नसून गेल्या पाच वर्षांमध्ये आढळराव पाटील यांचं नाव शिरूर मधून मिटलेलं असून येथील जनतेला वंचित बहुजन आघाडी हाच पर्याय राहिलेला आहे त्यामुळे येथील जनतेला वंचित बहुजन आघाडीचे उच्चशिक्षित उमेदवार डॉ. आफताब अनवर शेख हाच पर्याय असून लोकांनी येणाऱ्या निवडणुकीत तो सत्यात उतरवावा.
यावेळी वंचित बहुजन आघाडी पुणे पश्चिम अध्यक्ष कमलेश करंडे, महासचिव सतीश साळवे, महासचिव राहुल इनकर, उपाध्यक्ष सचिन साबळे, उपाध्यक्ष रणजीत पाडळे, संघटक संतोष मिसाळ, साईनाथ लोंढे, विश्वनाथ घोडके, जावेद मोमीन, सल्लागार बाळासाहेब मोरे, सहसचिव धीरज कांबळे, शिरूर तालुका अध्यक्ष जितेंद्र जगताप, आंबेगाव तालुका अध्यक्ष शिवाजी राजगुरू, महिला तालुकाध्यक्ष दिपाली साबळे, खेड तालुकाध्यक्ष महेंद्र नाईकनवरे, पिंपरी चिंचवड महासचिव संजय ठोंबे, हवेली तालुका अध्यक्ष संजय साळवे, हडपसर विधानसभा अध्यक्ष विश्वास गदादे यांनी मनोगते व्यक्त केली शिवाय शिरूर, जुन्नर, आंबेगाव, खेड, भोसरी विधानसभा, हडपसर विधानसभा व हवेली तालुक्यातून शेकडोंच्या संख्येने पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.