उत्कर्षा रुपवतेंच्या प्रचार सभेसाठी प्रकाश आंबेडकर शनिवारी श्रीरामपुरमध्ये
उत्कर्षा रुपवतेंच्या प्रचार सभेसाठी प्रकाश आंबेडकर शनिवारी श्रीरामपुरमध्ये

शिर्डी लोकसभा मतदारसंघातील वंचित बहुजन आघाडीच्या उमेदवार उत्कर्षा रुपवते यांच्या प्रचारासाठी श्रीरामपूर येथे ‘संविधान निर्धार सभा’ आयोजित करण्यात आली आहे. वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर यांच्या प्रमुख उपस्थितीत या सभेचे आयोजन करण्यात आले आहे.
दुपारी १२ वाजता सभा
शनिवारी (ता.४) मिनी स्टेडियम, कोर्ट रोड, श्रीरामपूर येथे दुपारी १२ वाजता सभा होणार असल्याची माहिती वंचित बहुजन आघाडीच्या संयोजकांनी दिली आहे. लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर प्रकाश आंबेडकर यांचे राज्यभर दौरे सुरु आहेत. वंचित आघाडीच्या शिर्डी लोकसभा मतदारसंघातील उमेदवार उत्कर्षा रुपवते यांच्या प्रचारानिमित्त त्यांची श्रीरामपुरात तोफ धडाडणार आहे. सभेसाठी जय्यत तयारी सुरु आहे. यावेळी ते आपल्या भाषणातून कोणावर निशाणा साधणार याची उत्सुकता आहे.