वंचित बहुजन आघाडी व प्रकाश आंबेडकराबद्दल अपशब्द वापरणाऱ्या साजिद खान यांना वंचितचा दणका
वंचित बहुजन आघाडी व बाळासाहेबांबद्दल अपशब्द वापरणाऱ्या साजिद खान यांना वंचितचा दणका
अकोला येथील काँग्रेसचे साजिद खान पठाण यांनी वंचित बहुजन आघाडी व श्रद्धेय बाळासाहेब आंबेडकर यांच्या बद्दल अपशब्द वापरून मुस्लिम समाजाचे मौलवी यांना धमक्या दिल्या होत्या याप्रकरणी संपूर्ण महाराष्ट्रातून रोष व्यक्त होत होता काल या प्रकरणात अकोला जिल्ह्याच्या वतीने व महानगर पश्चिम च्या वतीने अकोला एसपी यांना भेटून तक्रार दाखल केली होती तसेच अकोला जिल्ह्यातील सर्व तालुक्यातून व तालुक्यातील कार्यकर्त्यांना कडून सर्व पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यासंदर्भात तक्रार दाखल केली होती काल रात्री यासंदर्भात अकोला येथील दाबकी रोड पोलीस स्टेशन मध्ये वंचित बहुजन आघाडी चे कार्यकर्ते व स्थानिक जुने शहर व भीम नगर येथील रहिवासी रहिवासी पुरुष व महिलांनी डाबकी रोड पोलीस स्टेशन मध्ये गुन्हा दाखल करेपर्यंत ठिया आंदोलन केले यावेळी ॲडिशनल एस पी यांनी डाबकी रोड पोलीस स्टेशन मध्ये येऊन कार्यकर्त्यांचा व स्थानिक नागरिकांचा रोष पाहून पोलीस निरीक्षक यांना सदर प्रकरणात वंचित बहुजन आघाडीचे अकोला पश्चिम महानगर महासचिव गजानन गवई यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार गुन्हा दाखल करण्याचे आदेश दिले दाबकी रोड पोलीस स्टेशन मध्ये साजिद खान पठाण यांच्यावर काल रात्री साडेअकरा वाजता या प्रकरणात गुन्हा दाखल करण्यात आला