बोगस बियाणांची विक्री झाल्यास कारवाई करा, अन्यथा टाळे ठोकू ; ‘वंचित’चा इशारा
संभाजीनगर : खरिपाच्या लागवडीसाठी बियाणे, खते, कीटकनाशके यांचा वापर अत्यंत महत्त्वाचा ठरतो. मात्र, बोगस किंवा निकृष्ट दर्जाचे बियाणे विक्री केले जातात. बोगस बियाणांची विक्री केल्यास संबंधितांवर तत्काळ कारवाई करा, अन्यथा कार्यालयाला टाळे ठोकू असा इशारा वंचित बहुजन आघाडीने दिला आहे.
बोगस बियाणांच्या विक्रीमुळे शेतकऱ्यांच्या शेतमालाला हमीभाव मिळत नाही. त्यामुळे शेतकऱ्यावर मोठे आर्थिक नुकसान होते. यावर प्रशासनाचे काटेकोर नियंत्रण असले पाहिजे. बोगस बियाणांची विक्री बंद झाली पाहिजे. शेतकऱ्यांना बियाणे अल्प दरात उपलब्ध करून दिली पाहिजे. बोगस बियाणे विक्रेत्यांवर दंडात्मक कार्यवाही केली पाहिजे. तालुकास्तरावर बोगस बियाणी विक्री करांवर नियंत्रण ठेवण्यासाठी पथके नेमावी अशी मागणी वंचित बहुजन आघाडीने म्हटले आहे. याबाबत जिल्हाधिकारी कार्यालयात निवेदन देण्यात आले.
यावेळी जिल्हाध्यक्ष योगेश बन, मंगेश निकम, मिलिंद बोर्डे, पी. के. दाभाडे, सुभाष कांबळे, प्रवीण जाधव, भाऊराव गवई, गणेश खोतकर, रवी रत्नपारखे आदी पदाधिकारी उपस्थित होते.