प्रकाश आंबेडकर घेणार मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट
शेती महामंडळ कामगारांना जागा मिळवून देण्याच्या संदर्भात ॲड प्रकाश आंबेडकर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना भेटणार
रत्नपुरी शेती महामंडळ येथील कर्मचारी व कर्मचाऱ्यांच्या वारसदारांनी उदरनिर्वाहासाठी जागा व हाताला काम मिळावे या संदर्भामध्ये आमरण उपोषण धरलेले होते यामध्ये उपोषणकर्यांच्या प्रमुख मागण्या शेती महामंडळ कामगार व वारसदार यांना राहण्यासाठी दोन गुंठे जागा मिळावी, कामगारांना उदरनिर्वाहासाठी शेती करण्यास द्यावी, धन दांडग्यांना करारावर करण्यास दिलेल्या जमिनी परत घ्याव्या, करार केलेल्या जमिनीवर पूर्वीसारखा ऊस मळा चालू करावा अशा प्रकारच्या प्रमुख मागण्यासाठी आमरण उपोषण धरण्यात आलेले होते यावेळी वंचित बहुजन आघाडीच्या वतीने पुणे जिल्हाध्यक्ष राज कुमार व पदाधिकारी यांनी त्या उपोषणास भेट देऊन उपोषणाला पाठिंबा दिला यानंतर जिल्हाध्यक्ष राजकुमार यांनी वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय नेते ॲड बाळासाहेब आंबेडकर यांना दूरध्वनीवरून संपर्क करून उपोषणास बसलेल्या लोकांची माहिती व त्यांच्या प्रमुख मागण्या सांगितल्या यावेळी ॲड बाळासाहेब आंबेडकर यांनी सांगितले या संदर्भात मी अगोदरच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना सांगितलेल असून यासंदर्भात पुन्हा एकदा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना भेटून सर्व शेतमजूर कामगारांना दोन गुंठा जागा राहण्यासाठी दिली जाईल आणि हा निर्णय लवकरच होईल असे सांगण्यात आले.
यावेळी उपोषणास पाठिंबा देण्यासाठी पुणे जिल्हा अध्यक्ष राज कुमार, महासचिव सतिश साळवे, सचिव गोविंद कांबळे, संघटक संतोष मिसाळ, विशाल सोनवणे, संजय धीमधीमे, संतोष चव्हाण, पिनेल चव्हाण, आकाश चव्हाण कर्यकर्ते व पदाधीकारी उपस्थित होते