ओबीसी आरक्षण बचाव यात्रेचे ॲड. प्रकाश आंबेडकरांकडून छगन भुजबळांना निमंत्रण !
ओबीसी आरक्षण बचाव यात्रेचे ॲड. प्रकाश आंबेडकरांकडून छगन भुजबळांना निमंत्रण !
मुंबई : वंचित बहुजन आघाडीच्यावतीने ओबीसी आरक्षण बचाव यात्रेत सहभागी होण्यासाठी वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष ॲड. प्रकाश आंबेडकर यांनी राष्ट्रवादी काॅंग्रेस (अजित पवार) गटाचे नेते छगन भुजबळ यांना ई-मेलद्वारे निमंत्रण पाठवले आहे.
ॲड. आंबेडकर यांनी याची माहिती त्यांच्या एक्स हॅंडलवर पोस्ट करुन दिली आहे. ओबीसी आरक्षण बचाव यात्रा २५ जुलैला चैत्यभूमी, मुंबई येथून सुरू होणार असून त्याच दिवशी पुण्यातील महात्मा फुले वाड्यालाही भेट देण्यात येणार आहे. राज्यातील अनेक जिल्ह्यातून ही यात्रा जाणार आहे.
तसेच, ओबीसी आरक्षण बचाव यात्रेत सहभागी होणाऱ्यासाठी ओबीसी आंदोलकांसह, महाराष्ट्रातील काही बड्या नेत्यांनाही निमंत्रण पाठवण्यात येणार असल्याची माहिती आहे.
