ताज्या घडामोडी महाराष्ट्र वंचित बहुजन आघाडीच्या वतीने नेवासा महसूल विभागाला कुलूप ठोकण्याचा इशारा. July 29, 2024July 29, 2024 EMS NEWS 116 Views 0 Comments newasa 1 min read नेवासा शहरामध्ये शॉर्टसर्किटमुळे लागलेल्या भीषण आगीमध्ये नेवासा बाजारपेठे मधील नगरपंचायत चौकातील १५ ते १६ व्यापाऱ्यांचे दुकाने अग्नी तांडवणे जळून खाक होऊन मोठ्या प्रमाणात नुकसान झाल्यामुळे हे व्यापारी मोठ्या आर्थिक अडचणीत सापडल्यामुळे प्रशासनाच्या वतीने लवकरात लवकर या व्यापाऱ्यांना नुकसान भरपाई मिळावा अशी मागणी वंचित बहुजन आघाडीचे तालुका अध्यक्ष पोपट सरोदे व युवा तालुका अध्यक्ष संतोष कासोदे यांनी महसूल विभागाशी केली आहे तसेच नुकसान भरपाई सात दिवसाच्या आत या गाळेधारकांना तात्काळ द्यावी अन्यथा वंचित बहुजन आघाडीच्या वतीने नेवासा तहसीलच्या महसूल विभागाला कुलूप लावण्याचा इशारा वंचित बहुजन आघाडीच्या वतीने देण्यात आला आहे तसेच नेवासा नगरपंचायतीच्या बोगस कारभारामुळे अशा घटना नेवासा तालुक्यात अनेक वेळा घडल्या आहे कारण नैसर्गिक आपत्ती व्यवस्थापनाची कोणत्याही प्रकारची समिती या नगरपंचायत मध्ये सोयीस्करपणे कार्य करत नाही या अगोदर सुद्धा नेवासा कचरा डेपोला भीषण अशी आग लागली होती तरीसुद्धा या नगरपंचायत च्या कर्मचाऱ्यांना का जाग येत नाही असा सवाल वंचित बहुजन आघाडीच्या वतीने करण्यात आला तसेच लवकरात लवकर नेवासा नगरपंचायत च्या वतीने अग्निशामक पथक तयार करण्यात यावा जेने करून भविष्यात अशा घटना आटोक्यात आणता येईल तसेच या बोगस नगरपंचायत च्या कोणत्याही प्रकारची घरपट्टी पाणीपट्टी स्वच्छता कर असे कोणतेही कर न भरण्याचे आवाहन भरण्याचे आवाहन वंचित बहुजन आघाडीच्या वतीने समस्त नेवासकर नागरिकांना करण्यात आले आहे.