वंचितच्या उमेदवारांची पहिली यादी जाहीर
वंचित बहुजन आघाडीने लोकसभा निवडणुकीसाठी महाराष्ट्रातील उमेदवारांची पहिली यादी जाहीर करण्यात येत आहे.
1) भंडारा-गोंदिया लोकसभा मतदारसंघातून संजय गजाणंद केवत यांना उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे
2)गडचिरोली-चिमूर लोकसभा मतदारसंघातून हितेश पांडुरंग मढवी यांना उमेदवारी देण्यात आली आहे.
3) चंद्रपूर लोकसभा मतदारसंघातून राजेश बेल्हे यांना उमेदवारी देण्यात आली आहे
4)बुलढाणा लोकसभा मतदारसंघातून वसंत मगर यांना लोकसभेची उमेदवारी देण्यात आली
5)अकोला लोकसभा मतदारसंघातून प्रकाश आंबेडकर यांना उमेदवारी देण्यात आली आहे
6)अमरावती लोकसभा मतदारसंघातून प्राजक्ता पिल्लेवान यांना उमेदवारी देण्यात आली आहे
7)वर्धा लोकसभा मतदारसंघातून प्रो.राजेंद्र साळुंके यांना उमेदवारी देण्यात आली आहे
8)यवतमाळ-वाशीम लोकसभा मतदारसंघातून खेमसिंग पवार यांना उमेदवारी देण्यात आली आहे
- वंचित बहुजन आघाडीच्या राज्य कार्यकारणीने नागपूरमधून भारतीय राष्ट्रीय काँग्रेसच्या उमेदवाराला पाठिंबा देण्याचा निर्णय घेतला आहे.
- वंचित बहुजन आघाडीच्या राज्य कार्यकारणीने सांगलीतून प्रकाश शेंडगे (ओबीसी बहुजन पक्ष) यांनी निवडणूक लढविल्यास त्यांना पाठिंबा देण्याचा निर्णय घेतला आहे.अशी माहिती प्रकाश आंबेडकर यांनी पत्रकार परिषदेतून देण्यात आली.